आमची संस्था मराठा उद्योजकांसाठी कार्य करणारी देशपातळीवरील संस्था आहे. मराठा समाजातील उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे, प्रशिक्षण देणे व त्यांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मराठा उद्योजकांमध्ये अंतर्गत संपर्क साधणे तसेच वेळोवेळी त्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन शिबिरे, सल्लागारांचे आयोजन करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करणे, मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रवृत्त करणे आदी उद्दिष्ट्य धोरणाने ही संस्था कार्यरत आहे.